Saturday, November 20, 2021

कृषी कायद्यांची घरवापसी...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

कृषी कायद्यांची घरवापसी

बळीराजा जिंकला म्हणायचा,
आम्हालाही मोह आहे.
पण याची मात्र शंका येते,
हा निवडणूक तह आहे.

देर आये,दुरुस्त आये,
म्हणायलाही जीभ रेटत नाही.
कायदे मागे घेणे हेसुद्धा,
कंगना सारख्याला पटत नाही.

समाधान एवढेच की,
बलिदान व्यर्थ गेलेले नाही !
जय जवान,जय किसान,
हे पुरेपूर सिद्ध झालेले नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6326
दैनिक पुण्यनगरी
20नोव्हेंबर2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026