Wednesday, November 3, 2021

क्रिकेट आणि वेड...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

क्रिकेट आणि वेड

भारतीय क्रिकेट वेडे,
वेडेपणाला जागू लागले.
विकृतीचा कळस व्हावा,
एवढे नीचपणे वागू लागले.

आपल्याच हाताने आपली,
टर उडविणे बरे नाही.
ज्यांना एरव्ही डोक्यावर घेतो,
त्यांना तुडविणे खरे नाही.

तुमचे खेळावर प्रेम आहे,
आहे त्यापेक्षाही जास्त करा !
तुमचा वेडेपणा समजू शकतो,
पण त्याचे प्रदर्शन रास्त करा!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6311
दैनिक पुण्यनगरी
3नोव्हेंबर2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...