Thursday, November 25, 2021

संपाचे बूमरँग...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

संपाचे बूमरँग

संप फुटला जातो,
संप मिटला जातो.
संशयाचा धुरळा,
वारंवार उठला जातो

कुणी बाटगा असतो,
कुणी कोडगा असतो
सर्वमान्य होईल असा,
क्वचितच तोडगा असतो.

एकीची बेकी झाली की,
डोकेही हँग होवू शकते!
संपाचे दुधारी हत्यार,
मग बूमरँग होऊ शकते !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6331
दैनिक पुण्यनगरी
25नोव्हेंबर2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026