Sunday, November 14, 2021

नाद खुळा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

नाद खुळा

आजकाल राजकारणी,
शेंबड्या पोरासारखे वागू लागले.
नाद करायचा नाही म्हणीत,
एकमेकांच्या नादी लागू लागले .

राजकारण्यांच्या या नादाचा,
खरोखर नादच खुळा आहे !
त्यांची रोजची टवाळकी बघून,
आमच्याच पोटात गोळा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7755
दैनिक झुंजार नेता
14नोव्हेंबर 2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...