Sunday, November 21, 2021

अक्कल हुशारी...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

अक्कल हुशारी

सत्ताधाऱ्यापेक्षा विरोधकांकडे,
जी अक्कल आत्ता असते.
ती अक्कल नेमकी जाते कुठे?
जेंव्हा हातामध्ये सत्ता असते.

एक तर ही हातचलाखी,
किंवा ही अक्कलहुशारी असते !
सत्य जेवढे कडवट असते,
त्याहून ते जास्त विषारी असते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6327
दैनिक पुण्यनगरी
21नोव्हेंबर2021

 

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...