Thursday, November 18, 2021

कळप संस्कृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

कळप संस्कृती

काल वेगळी गाळप होती,
आज वेगळी गाळप आहे.
काल वेगळा कळप होता,
आज वेगळा कळप आहे.

या कळपातून त्या कळपात,
निवडही गाजारपारखी आहे !
कळप वेगळे असले तरी,
कळप संस्कृती सारखी आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-7759
दैनिक झुंजार नेता
18नोव्हेंबर 2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026