Thursday, November 4, 2021

बॉम्ब आणि स्फोट.. मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

------------------------

बॉम्ब आणि स्फोट

कुणाचे बॉम्ब वातीचे,
कुणाचे बिनवातीचे आहेत.
तरीही स्फोटावर स्फोट,
फोडणारे पक्के जातीचे आहेत.

वात असो वा नसो,
त्यांचे स्फोटावर डोळे आहेत!
आजकाल फुसक्या बॉम्बमुळेही,
पोटात गोळ्यावर गोळे आहेत !

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6312
दैनिक पुण्यनगरी
4नोव्हेंबर2021

No comments:

daily vatratika...3april2025