Tuesday, November 16, 2021

आरक्षण ड्रॉ...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

आरक्षण ड्रॉ

आरक्षणाचे ड्रॉ निघाले की,
आया-बायांची लॉटरी लागते.
पुरुषांना पुरुषार्थ दाखवायला,
आया-बायांची नोटरी लागते.

लॉटरी काय? नोटरी काय?
आया बाया,आया बाया असतात!
लोकशाहीच्या उजेडात,
आरक्षणाच्या छाया असतात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7757
दैनिक झुंजार नेता
16नोव्हेंबर 2021

 

No comments:

भक्त सलामत तो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- भक्त सलामत तो... किती भोंदू बाबा आले गेले, ज्यांचे भांडे सतत फुटले आहे. भोंदू हे भोंदूच असतात, अ...