आजची वात्रटिका
------------------------
बाबरीचे भूत
बाबरीच्या वादाला,
पुन्हा पुन्हा ऊत आहे.
कुणाच्या तरी मनगुटीवर,
बाबरीचे भूत आहे.
बाबरीचा वाद काही,
मिटता मिटत नाही.
बाबरीचे भूत काही,
खुटता खुटत नाही.
बाबरीच्या भूताचा मुद्दा,
राजकारणात खपू लागतो!
ज्याला वाटते भीती,
तो रामनाम जपू लागतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------ ---------
फेरफटका-8228
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
11एप्रिल2023
No comments:
Post a Comment