Wednesday, April 26, 2023

भावी मुख्यमंत्री


















 आजची वात्रटिका

------------------------


भावी मुख्यमंत्री


दारातले राजकारण घरातआले,

घरातले चुलीपर्यंत आणू लागल्या.

आजकाल बायकाही नवऱ्यांना,

भावी मुख्यमंत्री म्हणू लागल्या.


बायकांचे भाऊ,मेणाहून मऊ,

भावी मुख्यमंत्री आपला दाजी आहे.

आपल्या दाजीसाठी साल्यांची,

भावी मुख्यमंत्र्याची बॅनरबाजी आहे.


भावी मुख्यमंत्रीपदासाठीचे इच्छुक,

सगळ्यांनीच ओळखलेले आहेत!

म्हणूनच चांद्यापासून बांद्यापर्यंत,

उतावळे बॅनर झळकलेले आहेत!!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

  मोबाईल-9923847269

----------------------------------

चिमटा-6789

दैनिक पुण्यनगरी

वर्ष -19वे

26एप्रिल2023

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...