Wednesday, April 5, 2023

तवा बाबा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

तवा बाबा

सगळेच बाबा प्रचंड गाजतात,
सध्या एका बाबाची हवा आहे.
चमत्कारिक बाबाच्या बुडाखाली,
अगदी गरमागरम तवा आहे.

ओव्याऐवजी तोंडी शिव्या आहेत,
ज्या आशीर्वाद म्हणून देता येतात.
तवा तापलेला असल्यावरच,
पोळ्या मस्त भाजून घेता येतात.

बुडाला तवा पोळत कसा नाही?
भक्तांना तर आश्चर्याचा धक्का आहे !
साधुसंत असल्याचा दावा नाही,
पण बाबा बुडाला मात्र पक्का आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6768
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
5एप्रिल2023
 

No comments:

daily vatratika...29jane2026