Friday, April 28, 2023

भाकरीची फिरवाफिरवी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

भाकरीची फिरवाफिरवी

अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे,
ते मस्ती कशी जिरवत असतात?
भाकरी करपण्या अगोदरच,
भाकरी गर्रकन फिरवत असतात.

तवा कितीही तापलेला असो,
भाकरी मात्र शाबूत राहिली जाते.
कितीही आग आणि धूर निघू द्या,
परिस्थिती तर काबूत राहिली जाते.

त्यांची चूल, त्यांचीच भाकर आहे,
दुसऱ्यांचे मात्र गोंधळ माजू नयेत !
कारण नसताना कुणीही,
लष्कराच्या भाकऱ्या भाजू नयेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------------
चिमटा-6791
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
28एप्रिल2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका28एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 28एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -326वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1QV3qcRHfuL-_Lq3aptAie...