Thursday, April 13, 2023

भेटी - गाठी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

भेटी - गाठी

लटके रागवत ती म्हणाली,
अचानक भेटत जाऊ नकोस.
मला एकांतात कुठेतरी,
तू असा गाठत जाऊ नकोस.

लोकांना तुझ्या भेटीगाठी,
कुठून तरी कळत असतात.
काही नजरा छळतात,
काही नजरा जळत असतात.

आपल्या वाटा निराळ्या,
तरीही तू माझा श्वास आहे.
सरावलेल्या नाकांना,
भेटीत राजकीय वास आहे.

तुझ्या भेटीची नशाच वेगळी,
तुझी भेट म्हणजे शराब आहे!
सतत हवीहवीशी वाटली तरी,
हा जमाना खूप खराब आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
चिमटा-6776
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
13एप्रिल2023
 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...