Tuesday, July 5, 2022

खतरा धोका... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

खतरा धोका

लोकशाही वाचविण्याची
सगळ्यांकडूनच द्वाही आहे.
लबाड लांडग्यांच्या काळपात,
सध्या आपली लोकशाही आहे.

लांडगे जसे लबाड आहेत,
तसे लांडगे हांडगे आहेत!
त्यांचे राक्षसी इरादेसुद्धा,
एकमेकांपेक्षा दांडगे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7978
दैनिक झुंजार नेता
5जुलै2022

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...