Wednesday, July 27, 2022

टांगा पलटी .. मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

टांगा पलटी ..

काल कुणाशी करार होते?
आज कुणाशी करार आहेत?
सगळे टांगे पलटी होऊन,
सगळेच घोडे फरार आहेत.

घोडे फरार असले तर,
त्यांच्या तोंडी तोबरा आहे !
प्रसंग जेव्हढा लुब्रा आहे,
त्याहूनही तो चाभरा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7999
दैनिक झुंजार नेता
27जुलै2022

 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...