आजची वात्रटिका
---------------------
वेडी आशा
कुणी उच्च पदावर गेल्याने,
समाज पुढे जातो असे नाही.
एकाचा झाला म्हणून,
सर्वांचा उद्धार होतो असे नाही.
उद्धार होईल... उद्धार होईल...
आपण धोशा लावीत असतो !
अपेक्षाभंग होऊन सुद्धा,
आपण वेडी आशा लावत असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7994
दैनिक झुंजार नेता
22जुलै2022
No comments:
Post a Comment