Monday, July 4, 2022

वैतागवाडी.. मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

वैतागवाडी

आपला विश्वासघात बघून,
लोकांना वैताग आला आहे.
कधी नव्हे तेवढा मतदार राजा,
पुरता निराश झाला आहे.

मतदान यंत्रावरचा नोटासुद्धा,
लोकांना खोटा वाटू लागला.
नोटाचे बटन दाबून सुद्धा,
आपलाच तोटा वाटू लागला.

आपला मतदानाचा हक्क,
नाहक दवडून जातो आहे !
नोटाला मतदान केले तरी
नको तोच निवडून येतो आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7972
दैनिक झुंजार नेता
4जुलै2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका27एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -325वा

दैनिक वात्रटिका 27एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -325वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1NoornI--tmMB-ZAcXYuN3...