Wednesday, July 13, 2022

पक्षीय गुणधर्म... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

पक्षीय गुणधर्म

कधी पक्ष फुटला जातो,
कधी पक्ष तुटला जातो.
कधी होते वाटाघाटी,
कधी पक्ष वाटला जातो.

कधी पक्ष विलीन होतो,
कधी पक्ष मलीन होतो.
जाहीर रंडीबाजी करूनही,
कधी पक्ष कुलीन होतो.

कधी पक्ष सुस्त होतो,
कधी पक्ष मस्त होते.
खानदानी दुश्मनाचा,
कधी पक्ष दोस्त होतो.

पक्ष म्हणजे पक्ष असतो,
सत्ता हाच मोक्ष असतो!
सत्तेची भूक वाढली की,
पक्षच पक्षाचा भक्ष्य असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6529
दैनिक पुण्यनगरी
13जुलै 2022

 

1 comment:

Avinaskarpe said...

अत्यंत मार्मिक..... छान च

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...