Sunday, July 3, 2022

निष्ठेचे ॲफिडेव्हीट ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

निष्ठेचे ॲफिडेव्हीट

शिवबंधनाला चंदन लागले,
असेच आज चित्र आहे.
म्हणूनच शिवसैनिकांकडून,
निष्ठेचे प्रतिज्ञापत्र आहे.

निष्ठेचे प्रमाणपत्र म्हणजे,
निष्ठासुद्धा कागदी झाली.
उधारीवर राहतो कोण?
इथे निष्ठासुद्धा नगदी झाली.

तरीही सेनापतींची,
प्रमाणपत्रवरती मदार आहे !
आता सैनिकांच्या निष्ठेला,
कायदेशीर आधार आहे !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6519
दैनिक पुण्यनगरी
3जुलै 2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...