आजची वात्रटिका
---------------------
नाजूकता आणि साजूकता
दुसऱ्यांच्या दुखावलेल्या बघून,
धार्मिक भावना सुखवू लागल्या.
एकाचे बघून दुसऱ्याच्याही,
धार्मिक भावना दुखवू लागल्या.
आपण नाही त्यातले म्हणणारे,
धार्मिक बाबतीत साजूक होतात.
एरव्ही मुर्दाड असणाऱ्या भावना,
धार्मिक बाबतीत नाजूक होतात.
नाजूकता आणि साजूकता,
यांची दांभिक अशी तऱ्हा आहे !
म्हणूनच धार्मिक भावनांचा,
पंचनामा न केलेला बरा आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6522
दैनिक पुण्यनगरी
6जुलै 2022
No comments:
Post a Comment