आजची वात्रटिका
---------------------
फ्री स्टाईल
कोणत्याही नेत्याला नसले तरी,
त्यांच्या कार्यकर्त्याला बंधन असते.
नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांची फौज,
फाटाफूटीत आंदण असते.
नेत्यांनी जी ओढली त्याचीच,
कार्यकर्त्यांकडून री ओढली जाते!
नेत्यांसोबत कार्यकर्त्यांची फौज,
नेहमीच तर फ्री ओढली जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7982
दैनिक झुंजार नेता
10जुलै2022

No comments:
Post a Comment