Saturday, July 9, 2022

तोल मोल के बोल....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

तोल मोल के बोल

कौतुक करतात की टवाळकी?
हे संशोधनाचे विषय झाले आहेत.
जसे चायवाले पंतप्रधान,
तसे मुख्यमंत्रीही रिक्षावाले आहेत.

टपरीवाला आणि भाजीवाला,
अशी सरळ सरळ खिल्ली आहे.
टिंगल झालेल्यांच्याच ताब्यात
आज मुंबई आणि दिल्ली आहे.

हात दाखवून अवलक्षण झाले,
याचा पश्चाताप आज वाटतो आहे!
तरीही ताणलेल्या धनुष्यातून,
रोज नव नवा बाण सुटतो आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6525
दैनिक पुण्यनगरी
9जुलै 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...