आजची वात्रटिका
---------------------
राजमुद्रेचे सिंहावलोकन
अशोकस्तंभही स्तंभित व्हावा,
अशीच नवी सिंहमुद्रा आहे.
शांतताप्रिय भारताला,
आक्रमकतेचा हादरा आहे.
आक्रमक सिंहमुद्रेवरती,
हिंसक अशी छटा आहे.
सिंहावलोकन करून सांगा,
हा शंकास्पद दावा खोटा आहे.
वर वर चेंजिग इंडीया,
खाली आहे तोच ठेवलेला आहे !
बैल लावला,हत्ती लावला,
सोबत घोडाही लावलेला आहे!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6530
दैनिक पुण्यनगरी
14जुलै 2022
No comments:
Post a Comment