Saturday, July 16, 2022

असंसदीय शब्द... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

असंसदीय शब्द

संसदीय पावित्र्याची हमी
संसदेलाच दिली जाते.
असंसदीय शब्दांची यादी,
इथे वेळोवेळी केली जाते.

संसदेच्या पावित्र्याची,
सदस्यांनाही चाड असते!
जुने शब्द सोडून
नवनव्या असंसदीय शब्दांची
प्रत्येक अधिवेशनात वाढ असते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7987
दैनिक झुंजार नेता
16जुलै2022

 

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...