Monday, July 25, 2022

शाब्दिक गोंधळ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

शाब्दिक गोंधळ

कुणी म्हणतो बंड आहे,
कुणी म्हणतो उठाव आहे.
आमची मागणी म्हणजे,
शाब्दिक गोंधळ हटाव आहे.

बंड आणि उठाव म्हणजे,
निव्वळ शाब्दिक गोंधळ आहे !
लोकांना पक्के माहीत आहे,
नेमके कोण किती शिंदळ आहे?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6539
दैनिक पुण्यनगरी
25जुलै 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...