Showing posts with label शाब्दिक गोंधळ... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label शाब्दिक गोंधळ... मराठी वात्रटिका. Show all posts

Monday, July 25, 2022

शाब्दिक गोंधळ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

शाब्दिक गोंधळ

कुणी म्हणतो बंड आहे,
कुणी म्हणतो उठाव आहे.
आमची मागणी म्हणजे,
शाब्दिक गोंधळ हटाव आहे.

बंड आणि उठाव म्हणजे,
निव्वळ शाब्दिक गोंधळ आहे !
लोकांना पक्के माहीत आहे,
नेमके कोण किती शिंदळ आहे?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6539
दैनिक पुण्यनगरी
25जुलै 2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...