आजची वात्रटिका
---------------------
विठ्ठलास साकडे
बंडावरती बंड झाले,
पण एक मुद्दा याद आहे.
भक्तांचा विठ्ठलाशी नाही,
तर बडव्यांशी वाद आहे.
भक्त जेवढे भावूक,
तेवढेच ते कडवे असतात
विठ्ठल कुठलाही असो,
भोवताली बडवे असतात.
निष्ठावंत भक्तांचे,
बडव्यांकडून घात नकोत!
प्रत्येक विठ्ठलाला साकडे,
नेहमीच कमरेवर हात नकोत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6526
दैनिक पुण्यनगरी
10जुलै 2022

No comments:
Post a Comment