Thursday, July 21, 2022

चराऊ कुरण ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

चराऊ कुरण

राजकारणातून पैसा,
पैशातून राजकारण आहे.
चरणारांनीच सिद्ध केले,
सत्ता हे राखीव कुरण आहे.

राजकारणात पडले की,
आपोआप सगळे करावे लागते.
इतरांसाठी का होईना,
नाविलाजाने चरावे लागते.

चरावे परी किर्तीरूपी उरावे,
हे राजकीय सत्य आहे !!
जो चरला,तोच उरला,
यात खूप मोठे तथ्य आहे !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6535
दैनिक पुण्यनगरी
21जुलै 2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...