Tuesday, July 12, 2022

अशी ही पळवा पळवी.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

अशी ही पळवा पळवी

पक्षीय लोकशाहीला,
वाट्टेल तसे खेळवू लागले.
पूर्वी नेते,कार्यकर्ते पळवायचे,
आता पक्षच पळवू लागले.

तुम्हीच ठरवा ही प्रगती की,
लोकशाहीची अधोगती आहे ?
उत्तर काहीही असले तरी
इथे लोकशाहीच सती आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7984
दैनिक झुंजार नेता
12जुलै2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...