आजची वात्रटिका
---------------------
धक्केशाही
तेच झाले सावत्र सावत्र,
जे अगोदर सख्खे होते.
सुरत,गुवाहाटी आणि गोवा,
असे धक्क्यावर धक्के होते
धक्क्यावर धक्के बसत गेले,
प्रत्येक धक्का खरा होता!
याच्यापेक्षा पहाटचा शपथविधी,
कितीतरी प्रमाणात बरा होता!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
दैनिक वात्रटिका
3जुलै 2022
No comments:
Post a Comment