आजची वात्रटिका
---------------------
नवी मळवाट
पळवाटा शोधणे हा उपाय नसतो,
तर वाटा शोधणे हा उपाय असतो,
पळवाटा शोधीत बसाल तर,
त्याचा आपल्यालाच अपाय असतो.
पळवाटा पेक्षा वाट शोधणे,
हीच खरी नवी मळवाट असते !
छातीही आत्मविश्वासाने फुगते
जेंव्हा जगाकडे तुमची पाठ असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7986
दैनिक झुंजार नेता
14जुलै2022
No comments:
Post a Comment