Tuesday, July 12, 2022

शिव..शिव...शिव..... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

शिव..शिव...शिव..

कुणाची निष्ठा पोटात आहे,
कुणाची निष्ठा ओठात आहे.
सैनिक विचारी सैनिकाला,
तू नेमक्या कोणत्या गोटात आहे?

कुणी तळ्यात,कुणी मळ्यात,
कुणी अलगद जाळ्यात आहेत!
सगळ्या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे,
सामान्य सैनिकांच्या डोळ्यात आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6528
दैनिक पुण्यनगरी
12जुलै 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...