आजची वात्रटिका
---------------------
दे धक्का !
संपूर्ण महाराष्ट्राला,
हा तर दे धक्का आहे.
शिंदे झाले मुख्यमंत्री,
हा हुकूमाचा ' एक्का 'आहे.
ऐनवेळी नको नको म्हणीत,
पुन्हा येईन म्हणणारे आले.
धक्क्यावर धक्के बसून,
सगळे आश्चर्यचकीत झाले.
प्रतिक्रियांचे म्हणाल तर,
सगळी उलटी सुलटी आहे !!
पॅनलवाले आणि चॅनलवाले,
यांचीही टांगा पलटी आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6517
दैनिक पुण्यनगरी
1जुलै 2022
No comments:
Post a Comment