Friday, July 8, 2022

खाऊ गल्ली... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

खाऊ गल्ली

भ्रष्टाचारी कर्मचारी म्हणजे,
खरोखरच एक वल्ली असते.
ऑफिसातील टेबलांची रांग,
जणू एक खाऊ गल्ली असते.

खुर्चीवरच्या भ्रष्ट वल्लींना,
फायलीप्रमाणे खाऊ हवा असतो.
पापी पेट का सवाल है,
असा भ्रष्टांचा लाचार दावा असतो.

जसे खाणारे लाचार असतात,
तसे देणारेही लाचार असतात !
खाऊ गल्ली पोसण्यामागे,
मोठे व्यवहारिक विचार असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6524
दैनिक पुण्यनगरी
8जुलै 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 244वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 244वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1pdEGCxoCqmh185jRv5...