आजची वात्रटिका
---------------------
आवाज कुणाचा?
ना चवलीचा भरोसा राहिला आहे,
ना पावलीचा भरोसा राहिला आहे.
आधल्या शेरास सव्वाशेर निघाल्या,
ना सावलीचा भरोसा राहिला आहे.
मेहनत गेली,कष्ट गेले,
जणू आपलाच घाम खोटा आहे !
आयजीजीच्या जीवावर
बायजी उदार निघाले,
जणू आपलाच दाम खोटा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6540
दैनिक पुण्यनगरी
26जुलै 2022
No comments:
Post a Comment