Wednesday, July 13, 2022

गुरू - शिष्य ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

गुरू - शिष्य

भक्तीच्या नावाखाली,
नको ते प्रकार सुरू झाले.
नको ते,नको त्याचे,
पक्के चेले,पक्के गुरु झाले.

गुरुत्वाची लोच्या-लोची आहे,
गुरूत्वाची कोचा- कोची आहे.
गुरू आणि शिष्यालाही,
एकमेकामध्ये महारुची आहे.

ऑफलाइन,ऑनलाईन,
दृश्य आणि अदृश्य आहेत!
आंधळे,गोंधळे,वेंधळे,
जसे गुरू,तसे शिष्य आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7985
दैनिक झुंजार नेता
13जुलै2022

 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...