आजची वात्रटिका
---------------------
एका मुलाखतीचा सारांश
जसा फुलटॉस वर फुलटॉस होता,
तसा सिक्सवरती सिक्स होता.
त्यामुळेच विरोधकांचा आरोप,
मुलाखतीचा सामना फिक्स होता.
जसे मुलाखत,मुलाखतकार फिक्स,
तसे प्रश्न आणि उत्तरही फिक्स होते.
नैराश्य आणि सहानुभूती,
दोन्हीही एकमेकांत मिक्स होते.
काही रेमटलेले,काही चेमटलेले,
तरी हवे तसेच प्रतिबिंब उमटले होते !
सगळी टांगा पलटी होवूनसुद्धा,
राऊतांनीच घोडे दामटलेले होते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6541
दैनिक पुण्यनगरी
27जुलै 2022
No comments:
Post a Comment