आजची वात्रटिका
---------------------
फेकेशाही आणि धोकेशाही
फेक्यांनी फेक्यांसाठी चालवलेले,
राज्य म्हणजे फेकेशाही होय.
धोकेबाजांनी केलेली धोकेबाजी,
म्हणजे आजची धोकेशाही होय.
फेकेशाही आणि धोकेशाही,
हेच लोकशाहीचे आधार आहेत !
लोकांच्या मूलभूत गरजाही,
अजूनपर्यंत तरी उधार आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6531
दैनिक पुण्यनगरी
16जुलै 2022
No comments:
Post a Comment