Showing posts with label फेकेशाही आणि धोकेशाही.... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label फेकेशाही आणि धोकेशाही.... मराठी वात्रटिका. Show all posts

Saturday, July 16, 2022

फेकेशाही आणि धोकेशाही.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

फेकेशाही आणि धोकेशाही

फेक्यांनी फेक्यांसाठी चालवलेले,
राज्य म्हणजे फेकेशाही होय.
धोकेबाजांनी केलेली धोकेबाजी,
म्हणजे आजची धोकेशाही होय.

फेकेशाही आणि धोकेशाही,
हेच लोकशाहीचे आधार आहेत !
लोकांच्या मूलभूत गरजाही,
अजूनपर्यंत तरी उधार आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6531
दैनिक पुण्यनगरी
16जुलै 2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...