Showing posts with label सेतू अभ्यासाचा हेतू... मराठी वात्रटिका.आजची वात्रटिका. Show all posts
Showing posts with label सेतू अभ्यासाचा हेतू... मराठी वात्रटिका.आजची वात्रटिका. Show all posts

Monday, July 11, 2022

सेतू अभ्यासाचा हेतू... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

सेतू अभ्यासाचा हेतू

विद्यार्थी कोरोनापूर्व युगाला,
कोरोनोत्तर युगाशी सांधू लागले.
जुन्या ज्ञानाशी नव्या ज्ञानाचा,
शालेय विद्यार्थी सेतू बांधू लागले.

सेतू अभ्यास म्हणजे,
कुणा कुणाला कोडे वाटते आहे.
नेहमीच वरातीमागून येणारे,
कागदी घोडे वाटते आहे.

कुणी तोडतो अकलेचे तारे,
कुणाकडून ज्ञानाची पाजळणी आहे!
थोडक्यात सांगायचे तर,
सेतू ही अभ्यासाची उजळणी आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7983
दैनिक झुंजार नेता
11जुलै2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...