Showing posts with label पॉलिटिकल हॅकिंग... मराठी वात्रटिका...आजची वात्रटिका. Show all posts
Showing posts with label पॉलिटिकल हॅकिंग... मराठी वात्रटिका...आजची वात्रटिका. Show all posts

Monday, July 18, 2022

पॉलिटिकल हॅकिंग... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

पॉलिटिकल हॅकिंग

आमदार निवडून आणण्यापेक्षा,
आमदार फोडणे स्वस्त झाले.
निवडा-निवडीपेक्षा फोडाफोडीचे,
भाव रोखठोक आणि रास्त झाले.

फोडलेले आमदार म्हणजे,
रेडीमेड मालाची पॅकिंग आहे !
थोडक्यात सांगायचे झाले तर,
ही पॉलिटिकल हॅकिंग आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6532
दैनिक पुण्यनगरी
18जुलै 2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...