Showing posts with label आरक्षण सोडत.... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label आरक्षण सोडत.... मराठी वात्रटिका. Show all posts

Friday, July 29, 2022

आरक्षण सोडत.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

आरक्षण सोडत

कुणी आनंदाने उडत असते,
कुणी मनामध्ये कुढत असते.
कधी लकी,कधी अनलकी,
आरक्षणाची सोडत असते.

आरक्षणाच्या सोडतीवर,
राजकीय डाव आखले जातात!
आरक्षणाची कडू गोड फळे,
परिस्थितीनुसार चाखले जातात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6543
दैनिक पुण्यनगरी
29जुलै 2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...