Friday, June 14, 2019

नकारात्मक प्रसिद्धी



आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
नकारात्मक प्रसिद्धी
कधी खरोखरचा तमाशा,
कधी खोटे-नाटे नाटक असते.
नकारात्मक प्रसिद्धीची,
राजकारणात जास्त चटक असते.
शब्दांची होते फिरवाफिरवी,
भूमिका उलट्या-सुलट्या असतात !
त्यांचे त्यांनाही कळत नाही,
किती आलट्या-पलट्या असतात ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5477
दैनिक पुण्यनगरी
14जून2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

गर्दीचा शोध...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- गर्दीचा शोध पक्ष फुटले;नेते फुटले, प्रचार सभांना गर्दी आहे. जरूर आपला मतदार राजा, खरोखरच दर्दी आहे...