Sunday, June 16, 2019

वट पौर्णिमाआ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
वट पौर्णिमा
जे जे श्रद्धाळू आहेत,
त्यांना नक्की फटका आहे.
ज्यांचे विचार तर्कशुद्ध,
त्यांची नक्की सुटका आहे.
ज्याची त्याची श्रद्धा-अश्रद्धा,
ज्याच्या त्याच्या फळास यावी !
सात जन्मात एकदा तरी,
प्रत्येकाला आपली चॉईस हवी !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5479
दैनिक पुण्यनगरी
16जून2019
---------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

शेतकऱ्यांची लढाई

आजची वात्रटिका ----------------------- शेतकऱ्यांची लढाई आम्हीच शेकऱ्यांचे पाठीराखे, केवळ बढायावर बढाया आहेत. अनेक आघाड्यांवरती, शेतकऱ्यांच्...