Tuesday, June 25, 2019

नववधू पलायनआ।ज।ची ।वा।त्र।टि।का
-------------------------------
नववधू पलायन
नववधू असल्या तरी,
आजकाल त्या बावरत नाही.
भूतकाळाची आवराआवर करून,
स्वतःला मुळीच सावरत नाहीत.
प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणीत,
जुनीच कॅसेट पुन्हा लावतात !
हळद फिटण्या अगोदरच,
आपल्या कुंकवाला चुना लावतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5488
दैनिक पुण्यनगरी
25जून2019
--------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
suryakantdolase.blogspot.com
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://www.facebook.com/suryakant.dolase

No comments:

निषेध !

आजची वात्रटिका ---------------------- निषेध ! सांगताही येत नाही, कधी काळचा रोष आहे? 'मीटू मीटू' च्या वादळाला, राहून राहून जोश आहे. क...