Thursday, June 13, 2019

वादळी अंदाज

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
वादळी अंदाज
कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय
तिच्या वादळाचा अंदाज येतो
उद्या-परवा घ्यायची काळजी,
तो मग आजच्या आज घेतो.
तिच्या डोळ्यात विजा चमकतात,
भावनांचे ढग गडगडू लागतात !
वादळाचे आवेगावर आवेग,
मुसळधार सरी झडू लागतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5476
दैनिक पुण्यनगरी
13जून2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

निषेध !

आजची वात्रटिका ---------------------- निषेध ! सांगताही येत नाही, कधी काळचा रोष आहे? 'मीटू मीटू' च्या वादळाला, राहून राहून जोश आहे. क...