Thursday, August 26, 2021

प्लस-मायनस...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

प्लस-मायनस

कोणाच्या तिसऱ्या लाटेची,
तिसरी घंटा वाजू लागली.
कोरोना गेला म्हणणारात,
मोठी खळबळ माजू लागली.

जसी लसीवर नवी लस आहे,
तसा कोरोनालाही जोश आहे !
पेशंटचा आकडा मायनस तरी,
कोणाकडे मात्र डेल्ट प्लस आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
फेरफटका-7685
दैनिक झुंजार नेता
26ऑगस्ट 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...