Wednesday, August 18, 2021

अफगाणिस्तानच्या निमित्ताने...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

अफगाणिस्तानच्या निमित्ताने

दहशतवाद्यांना धर्म असता तर,
त्यांनी स्वधर्मीयही चिरडले नसते.
एका धर्माच्या वरवंट्याखाली,
परधर्मीयही कधी भरडले नसते.

ज्यांची दहशतवादाला सहानुभूती,
त्यांना याचा प्रत्यय येऊ शकतो!
लवकरच पाकिस्तानचाही,
नक्की अफगाणिस्तान होऊ शकतो !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6238
दैनिक पुण्यनगरी
18ऑगस्ट 2021

 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...