Tuesday, August 24, 2021

गॅसचे 'सहस्त्र' दर्शन..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

गॅसचे 'सहस्त्र' दर्शन

पेट्रोल आणि डिझेलने,
शताब्दी गाठली आहे.
दोघांची शताब्दी बघून,
गॅसची ट्यूब पेटली आहे.

भाववाढीच्या विरोधात,
जो तो उर बडवतो आहे!
सबसिडी काढून घेत,
गॅस सिलेंडर सुद्धा;
'सहस्त्र दर्शन' घडवतो आहे!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6244
दैनिक पुण्यनगरी
24ऑगस्ट 2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...