Saturday, August 7, 2021

सत्तांतर ते नामांतर......मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

सत्तांतर ते नामांतर

जे सत्तेवर येतात ते,
नामांतराचे रान उठवू लागतात.
विरोधकांचे नामोनिशाण,
वाट्टेल तसे मिटवून लागतात.

कुणाला तरी पुढे करताना,
कुणाला तरी मागे सारलेले असते!!
सत्तांतरानंतर नामांतर होणार,
हे समीकरण तर ठरलेले असते !

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6228
दैनिक पुण्यनगरी
7ऑगस्ट 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...